Nanded News

तपोवन एक्सप्रेस आणि नांदेड – पुणे रेल्वे 26 जानेवारीपासून धावणार

नांदेड: कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे पूर्वपदावर येत आहे . येत्या २६ जानेवारीपासून नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस आणि नांदेड पुणे रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही रेल्वे धावणार असल्याने प्रवाशांना आधीकाची सेवा मिळणार आहे.
देशात कोरोना चा प्रार्दुभाव पवाढल्यानंतर दळणवळणाची जवळजवळ सर्व साधने बंद करण्यात आली होती. यात रेल्वेचाही समावेश होता . आता कोरोणाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आल्याने पुन्हा  देशातील रेल्वे पूर्ववत सुरू होत आहेत . मराठवाड्यातील रेल्वे सेवा सुरळीत व्हावी यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे अटत पाठपुरावा केल्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी देवगिरी एक्सप्रेस ,राजाराणी, मराठवाडा, नंदिग्राम एक्सप्रेस यासह अनेक रेल्वे पूर्ववत सुरू झाल्या. त्यानंतर आता मुंबईला जाणारी तपोवन एक्सप्रेस सुरू करण्याच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
यासोबतच नांदेड – पुणे मनमाड मार्गे जाणारी रेल्वे आठवड्यातून दोन दिवस सुरू करण्याच्या अनुषंगानेही खा. चिखलीकर यांनी  केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून तपोवन एक्सप्रेस आणि दर आठवड्यातून दोन दिवस धावणारी नांदेड –  पुणे रेल्वे पुन्हा सुरू होणार आहे. खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातील रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागत असल्याने प्रवाशांचा रेल्वे अधिक चांगला होत आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या नियमांचे पालन करून प्रवाशांनी रेल्वेचा प्रवास करावा असे आवाहनही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: