
बिलोली पिडिता प्रकरणात दोषींवर
ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु
– केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नांदेड (जिमाका) दि. 18 :- बिलोली येथील मुकबधिर दिव्यांग पिडितावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बिलोलीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शासकिय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर उपस्थित होते.
00000
