National News

दाभडच्या सासू सुनेच्या लढाईत सासूबाईच ठर ल्या वरचढ ,सासुबाईं चार मतांनी विजयी..

दाभडच्या सासू सुनेच्या लढाईत सासूबाईच ठरल्या वरचढ ,सासुबाईं चार मतांनी विजयी..

अर्धापूर ( शेख जुबेर )
नांदेड जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या सासु -सुनेच्या लढाईत सासूबाईच वरचढ ठरल्या.या लढाईत सासूबाई रेखा दादाजवार ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी सुनबाई संगिता. दादाजवार यांचा आवघ्या चार मतांनी पराभव केला आहेई लढत आतपर्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची झाली. सुनबाईंनी देखिल कडवी लढत दिली.त्यांचा निसटता पराभव झाला.

.चित्रपटात.नाटकात ,मालीकेत सासू सुन एकमेकांना शाह कटशाह देण्याचे प्रसंग पहिले आहे.यात आता राजकारण ,निवडणुकीची भर पडली आहे. राज्यभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जवळचे नातेवाईक ,भाऊ ,मित्र एकमेकांच्या विरूद्ध निवडणूक लढवली होती..

दाभड (जिल्हा नांदेड) येथील एका लढतीने जिल्हाचे लक्ष वेधले होते.ही लढत जरा हाटकेच झाली होती ..ही लढत सासुबाईं विरूद्ध सुनबाई आशी झाली.. होणार सरपंच मी या गावची आसे म्हणत सूनबाई निवडणूक लढविली.तर सासूबाई सुध्दा तेव्हड्याच तयारीने निवडणूक लढविली. दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. मतदारांनी सासुबाईंना साथ दिली.

.

अर्धापूर तालुक्यातील आर्थिक मिळकतीच्या बाबतीत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून दाभड ग्रामपंचायतला ओळखल्या जाते येथील ग्रामपंचायत नऊ सदस्यांची असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. ग्रामपंचायतीच्या तीन वार्डातील आठ जागांसाठी मतदान घेण्यात आले..या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक .दोन मधून सासुबाई .रेखा दादज्वार व सुनबाई संगीता दादज्वार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. .दोन वेगवेगळ्या पॅनल मधून निवडणूक लढवली

.या निवडणुकीमध्ये सासुबाई रेखा दादाजवार यांनी सुनबाई संगिता दादजवार यांचा पराभव केला. रेखाबाई दादाजवार यांना 202 मते मिळाली तर सांगिता दादाजवार यांना 198 मतं मिळाली.ग्रामविकास करण्याची संधी सासुबाईंना मिळाली आहे..

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: