Maharshtra News Parbhani News

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाबाबत आढावा बैठक संपन्न

 

 

             

           

परभणी, दि.14 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभ मंगळवार दि.26 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यात सर्वत्र साजरा करावयाचा आहे.  त्या अनुषंगाने ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम परभणी येथे सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित आढावा बैठकीत दिली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी संबंधित सर्व कार्यालय प्रमुखांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभ साजरा करण्याच्या अनुषंगाने सविस्तर सुचना केल्या. या बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. या बैठकीस पोलिस, महानगरपालिका, महावितरण, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षणविभाग, आदिसह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: