
परभणी, दि.14 :- जिल्ह्यातील चिकन, मटण, अंडी विक्रेत्यांची महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त यांनी तर नगरपालिका किंवा नगर पंचायतीच्या ठिकाणी मुख्याधिकारी यांनी दि.18 जानेवारी 2021 पर्यंत विशेष मोहिम राबवून दुकानाची स्वच्छता विषयक आणि आरटीपीसीआर तपासणी करावी. तसेच आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्या संबंधितांविरुध्द कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. असे जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
