Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्ह्यातील लोककला पथकांनी निवडसूचीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

              

           

परभणी, दि.15 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या योजनांची माहिती सर्व सामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी यापूर्वीच्या लोककला आणि पथनाटय सादर करणाऱ्या संस्थाच्या जिल्हानिहाय निवडसूचीची मुदत 20 डिसेंबर 2020 रोजी संपली आहे. नवीन निवडसूची तयार करण्यासाठी त्या-त्या जिल्हयातील संबंधित लोककला व पथनाट्य संस्थांकडून 1 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतीम मुदत 21 जानेवारी 2021 अशी आहे. संबंधित संस्थांनी परभणी येथील जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय इमारत, वसमत रोड, परभणी या पत्त्यावर 21 जानेवारी 2021 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले आहे.

            परभणी जिल्हयातील लोककला/पथनाटयव्दारे माहिती देणाऱ्या उदाहरणार्थ गण गवळण, अभंग, पोवाडे, वगनाटय, बहुरूपी,भारूड आदी लोककला/पथनाटय पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. याबाबत या क्षेत्रातील अनुभवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करणाऱ्या लोककला संस्था आणि पथकला संस्थांकडे विविध विषयावर (शासकीय योजनासह ) कार्यक्रम, पथनाटय करण्याचा अनुभव असावा, पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरूष, वादक यांचा समावेश असावा. लोककला/पथनाटय पथक ज्या जिल्हयातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा, केंद्र सरकारच्या गीत आणि नाटय विभागाकडे संस्था नोंदणीकृत असल्यास प्राधान्य दिले जाईल. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.

            इच्छुक संस्थांनी येथील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना आणि माहिती पत्रक प्राप्त करून घ्यावे. अर्जाचा नमुना तसेच माहिती पत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज भरून जिल्हा माहिती अधिकारी यांना 21 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: