Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी सुट्टी जाहीर

 

 

   परभणी, दि.14 :-  परभणी जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 498 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ( 68 ग्रामपंचायती बिनविरोध) दि. १५ जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तरी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुका होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या कामगार, अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी शुक्रवार दि. १५ जानेवारी  २०२१ रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

    निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी- कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.  ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना , कारखाने , दुकाने इत्यादी मधील मतदारांना लागू राहिल ( उदा . खाजगी कंपन्यामधील आस्थापना , सर्व दुकाने व इतर आस्थापना , निवासी हॉटेल , खाद्यगृहे , अन्य गृहे , नाट्यगृहे , व्यापार , औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिंग सेंटर , मॉल्स , रिटेलर्स ) अपवादात्मक परिस्थितीत कामगार , अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील .  उद्योग , ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना , कारखाने , दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापकाने सर्व सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची कोटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल. असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

         -*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: