Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण करु – जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर कोव्हीड-19 ची लस परभणी जिल्हयात दाखल

 

 

 

 

            परभणी, दि.13 :- कोवीड-19 च्या प्रादुर्भावाला सुरु होवून एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. परभणी जिल्हा प्रशासनाने आणि परभणी जिल्हयातील नागरिकांनी अत्यंत संयमाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करीत या प्रादुर्भावाला मर्यादित स्वरुपात ठेवण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. तथापि या प्रादुर्भावापासून सुटका देणाऱ्या ज्या लसीची आपण अतुरतेने वाट पाहत होतो ती लस जिल्हयात दाखल झाली असून लसीकरणाचा हा टप्पा आपण यशस्वी पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केला.

            आज सायंकाळी जिल्हयामध्ये ही लस पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर त्यांच्या हस्ते लसीच्या सुरक्षिततेसाठी ज्या उपाय योजना आहेत त्या पूर्ण करीत मोठया क्षमतेच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आल्या. यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, डॉ. गणेश शिरसुलवार निवासी वैद्यकीय अधिकारी,  डॉ. किशोर सुरवसे आदींची उपस्थिती होती.

            स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता ज्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना पहिल्या फेरीत ही लस दिली जाणार आहे. जिल्हयात सुमारे दहा हजार आठशे हेल्थ वर्कर यांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करुन लसीकरणासाठी आवश्यक असलेला त्यांचा सर्व डाटाबेस तयार ठेवण्यात आला आहे. आज सुमारे नऊ हजार तीनशे तीस डोसेस जिल्हयाला प्राप्त झाले असून टप्या टप्याने भविष्यात लस उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले. कोवीड-19 पासून सुटका देणाऱ्या बहुप्रतिक्षेत असलेल्या या लसीची सुरक्षित वाहतुक करणारे वाहनचालक श्री. मोहम्मद मैनुद्दीन, मुख्य औषध निर्माण अधिकारी मंगला खिस्ते यांच्या प्रति आवर्जुन कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार करुन जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी उपस्थितांना सुखद धक्का दिला.

 

-*-*-*-*-

 

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: