Maharshtra Marathi News

‘प्यार किया तो डरना क्या?’; शिवसेना नेत्याकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

जालना: बलात्कार आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांमुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  अडणीत आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या   यांनी मुंडे यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याने त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. एककीडे मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत असताना दुसरीकडे आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने धनंजय मुंडे याची पाठराखण केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना, ‘प्यार किया तो डरना क्या…., असे म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील एक मंत्री अब्दुल सत्तार  यांनी मुंडे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्या महिलेने मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत, त्या महिलेबाबत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर कबुली दिली आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांचे संबंध दोघांच्या सहमतीने झाले आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिल्याचे ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्गारांची केली आठवण
या वेळी अब्दुल सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काढलेल्या उद्गारांची आवर्जून आठवण काढली. प्यार किया तो डरना क्या, असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याचे सत्तार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी आणि तत्संबधीची माहिती लपवल्याचा आरोप करत भाजप नेते किरीच सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर देखील सत्तार यांनी वक्तव्य केले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रांमध्ये माहिती लपवली होती. माहिती लपवणाऱ्या या नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू असा इशारा सत्तार यांनी भाजपला दिला आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: