

परभणी, दि.11 :- जिजाऊ माँ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, श्रीमती एस.आर.चोपडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
-*-*-*-*-
