
1971 च्या युद्वात सहभाग घेतलेल्या
हयात सैनिक अथवा त्यांच्या
विधवा पत्नींना माहिती देण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 7 :- सन 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या नांदेड जिल्हयातील हयात सैनिक ज्यांना सैन्यसेवेचे निवृत्ती वेतन आणि केन्द्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून मासिक / वार्षिक मदत मिळत नाही अशा महाराष्ट्र राज्याच्या अधिवासधारक सैनिकांचा तपशिल शासनाने मागविला आहे.
जिल्हयातील माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात डिस्जार्जबुक व माजी सैनिकांचे ओळखपत्र घेवून तपशिल नोंदवावा. माजी सैनिक हयात नसतील तर माजी सैनिक विधवा यांनी माहिती पाठवावी. जे माजी सैनिक कार्यालयात येऊ शकत नाही त्यांनी दूरध्वनी क्रमांक 9403069447 वर व्हाटसॲपवर तात्काळ माहिती पाठवावी व संपर्क करावा, असे आवाहन नांदेडचे सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
00000
