Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

१ ९ ७१ च्या युध्दात सहभागी हयात सैनिकांना अथवा त्यांच्या विधवांना माहिती देण्याचे आवाहन

        परभणी, दि.7 :-  1971 च्या भारत पाकिस्तान युध्दात सक्रिय सहभाग घेतलेल्या परभणी जिल्हयातील हयात सैनिक ज्यांना सैन्य सेवेचे निवृत्ती वेतन आणि केंद्रीय सैनिक बोर्ड , नवी दिल्ली यांच्याकडुन मासिक, वार्षिक चरितार्थ आर्थिक मदत मिळत नाही अशा महाराष्ट्र राज्याच्या अधिवासधारक सैनिकांचा तपशिल ( सैन्य नंबर , रँक , नाव , युनिट , भरती व निवृत्ती दिनांक तसेच पत्ता व मोबाईल नंबर , अगर माजी सैनिक हयात नसेल तर त्यांच्या विधवाचे नाव , पत्ता व मोबाईल नंबर ) विषयी मुळ कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , परभणी येथे बुधवार दि. २० जानेवारी २०२१ पर्यंत जमा करावीत. असे  आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर  यांनी केले आहे .

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: