National News

नवरीची मिरवणुक घोड्यावरून काढून दिला बेट ी बचाव चा संदेश,अर्धापूर शहरात ठरला कुतूहलाच ा विषय…

नवरीची मिरवणुक घोड्यावरून काढून दिला बेटी बचाव चा संदेश,अर्धापूर शहरात ठरला कुतूहलाचा विषय…

अर्धापूर ( शेख जुबेर ) विवाह सोहळा भव्यदिव्य करण्याचा प्रत्येकाचे स्वप्न आसते.तसेच जरा हाटके व अठवनित कसा राहिल यासाठी विविध शक्कल लढवली जाते.विवाह म्हटले की मिरवणुक आलीच.पण ही मिरवणुक नवरदेवाची आसते.सहसा नरवरीची मिरवणुक काढण्यात येत नाही..पण याला अपवाद अर्धापूर शहर ठरले आहे.शहरातील फुले नगरातील स्वतंत्र सैनिक कुटंबातील डाके परिवाराने आपल्या नवरीची मिरवणुक काढली तीही घोड्यावरून..शहरातील प्रमुख रस्त्यावरून सवाद्या मिरवणुक काढून मुलगा मुलगी समान आसते याचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आल्याने डाके कुटूंबाचे कौतुक होत आहे.तसेच बेटी बचाव बेटी पढाव या अभियानात चालना मिळाली आहे.

विवाह सोवळ्याचा नवरदेवाची मिरवणुक ही अविभाज्य घटक .ही मिरवणुक आगळी वेगळी करण्यासाठी प्रयत्न केला जातो.मिरवणुकीत घोडा, उघडी जीप , पालखी, तुतारी भालेदार ,चौपदार याचा सोबत डी जी ,अधुनिक तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो.अतिषबाजी केली जाते..पण हा सर्व आटापिटा नवरदेवाच्या मिरवणुकीसाठी .नवरीचे मिरवणुक सभागृहात पालखीतून काढण्यात येते.याला अर्धापूर शहरातील डाके कुटूंब अपवाद ठरले आहे.

शहरातील फुलेनगरात मारोती डाके राहतात.त्यांचे वडील नागोजी डाके हे स्वतंत्र सैनिक होते .त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग नोंदविला होता.त्यांची नात श्रुतिका हिचा विवाह सागर जहिरव यांच्याशी गुरुवारी (दि. सात ) आयोजित केला. या लग्नाच्या पुर्वसंध्येला बुधवारी (दि. सहा ) सायंकाळी वधू वराची मिरवणुक काढण्यात आली.

मारोती डाके यांचे जुने घर शहरातील जुन्या वस्तीतील रामनगर भागात आहे.या जुन्या घराच्या आठवनिला उजळा मिळावा यासाठी वधू श्रुतिका व वर सागर जहिरव यांची मिरवणुक रामनगर ,मारूती मंदिर या मार्गांनी फुलेनगरातील नवीन घरी गेली व सांगता करण्यात आली. ही मिरवणुक अर्धापूर शहरांत कुतूहल व कौतुकचा विषय ठरला आहे.आशा प्रकारची नवरीची मिरवणुक प्रथमच काढण्यात आली आहे.

मुलगा व मुलगी ही आम्ही समान मानतो.आत्ता पर्यंत नवरदेवाची मिरवणुक काढण्यात आलेली पाहिली होती.आपल्या मुलीचीही मिरवणुक काढून बेटी बचाव ,बेटी बचाव या आभियानाला चालना मिळावी व जुन्या आठवनिला उजळा मिळावा यासाठी मिरवणुक काढण्यात आली आशी भावना नवरीची आजी बायनाबाई डाके यांनी व्यक्त केली.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: