Maharshtra News Parbhani News

तुर हमी भावाने खरेदीकरीता शेतकऱ्यांनी नोंदणी करावी -जिल्हा पणन अधिकारी श्री.शेवाळे

 

     

      परभणी, दि. 6 :- केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने खरीप हंगाम 2020-21 मध्ये तुर नोंदणी दि.28 डिसेंबर 2020 पासून ऑनलाईन पध्दतीने सुरु असून तुर नोंदणी करण्याकरीता जिल्ह्यात एकुण 7 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तरी  केंद्राच्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आली असून शेतकऱ्यांनी तालुक्याच्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. असे आवाहन परभणीचे जिल्हा पणन अधिकारी के.जे.शेवाळे यांनी केले आहे.

            नोंदणीकरीता सोबत खरीप हंगाम 2020-21 मधील पिक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्क्यानिशीचा ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक प्रत, सोबत आणावी व बँक पासबुकावर शेतकऱ्याचे नाव, खाते क्रमाक, आयएफएससी कोड स्पष्ट नमूद असावा यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये.

            परभणी येथे तालुका खरेदी विक्री संघ मर्या.परभणी नवा मोंढ्यात असून केंद्र चालक माणिक निलवर्ण (भ्र. 9960093796)हे आहेत. जिंतूर येथे तालुका जिनींग प्रेसिंग सहकारी सोसायटी मर्यादित जिंतूर सिंध्देश्वर हायस्कुल जवळ असून केंद्र चालक नंदकुमार महाजन (भ्र. 9405473999)हे आहेत. पुर्णा येथे पुर्णा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ समर्थ मार्केंट येथे असून केंद्र चालक संदीप घाटोळ  (भ्र. 9359333413) हे आहेत. पाथरी येथे स्वस्तिक सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्डात असून  केंद्र चालक अनंत गोलाईत (भ्र. 9960570042)हे आहेत. सोनपेठ येथे स्वप्नभुमी सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था मार्केट कमिटी कॉम्प्लेक्समध्ये असून केंद्र चालक श्रीनिवास राठोड (भ्र. 9096699697)  हे आहेत. बोरी येथे तुळजाभवानी कृषी विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित बोर्डीकर कॉम्पलेक्स जवळ असून केंद्र चालक गणेश नांदेडकर (भ्र. 8806028082) हे आहे. तर सेलू येथे तुळजाभवानी विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित मार्केट यार्डात असून केंद्र चालक संतोष शिंदे (भ्र. 9860251327)  हे आहेत. तरी संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी तुर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. असे जिल्हा पणन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: