Maharshtra News Parbhani News

शिधापत्रिकेत आधार सिडींग व मोबाईल क्रमांक सिडिंगसाठी जिल्ह्यात मोहीम – जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मुथा

 

          

            परभणी, (जिमाका) दि.5 :- जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पास उपकरणामधील शपथपत्राद्वारे आधार सिडींग व मोबाइल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. रविवार दि. ३१ जानेवारी २०२१ पूर्वी प्रत्येक शिधापत्रिकेत लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सीडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिडिंग करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती  अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा यांनी दिली.

            राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सीडींग १०० टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केसरी) शेतकरी योजनेच्या सुमारे १४.९० लक्ष लाभार्थ्यांपैकी ८६.७०% लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे. शासन निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडिंग सुधारणे आवश्यक आहे. माहे जानेवारी २०२१ चे धान्याचे वाटप करतेवेळी ई-पास उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत कुटुंबातील सदस्यांचा आधार सीडींग नसल्यास अशा सदस्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या ठिकाणी जाऊन सिडिंग पूर्ण करून घ्यावे.                    पडताळणी व मोबाइल सिडिंग सुविधा वापरण्याची कार्यप्रणाली स्वस्त धान्य दुकानदार यांना कळविण्यात आली असून आवश्यक तेथे ही सुविधा वापरण्याबाबतचे प्रशिक्षण दुकानदारांना देण्यात येत आहे. दि. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडींग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लाभार्थी अन्नधान्यपासून वंचित राहू नये यासाठी ३१ जानेवारी २०२१ पूर्वी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक सीडींग १०० टक्के पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांनी केले आहे. 

             ज्या शिधापत्रिकावर मागील तीन महिन्यात धान्य उचलण्यात आलेले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तपासणीअंती तात्पुरती निलंबित करण्यात येईल किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. तरी अन्नधान्य लाभासाठी अशा शिधापत्रिका धारकांच्या कुटुंब प्रमुखांचे लेखी निवेदन तहसीलदार यांना प्राप्त झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडींग करून या शिधापत्रिका पात्र योजनेखाली समाविष्ट करण्यात येतील. सलग ३ महिने धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका जानेवारी २०२१ नंतर चौकशीअंती कायमस्वरूपी निलंबित करण्यात येईल. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करून आधार सीडींग व मोबाईल सिडींग ३१ जानेवारी २०२१ पूर्वी पूर्ण करावेत. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी  यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: