
परभणी, (जिमाका) दि.4 :- सहकारी तथा खाजगी साखर कारखान्यांना लागणाऱ्या उसासाठी मोठया प्रमाणात रस्त्यावरुन वाहतुक केली जात आहे. ही वाहतुक ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी मोठया ट्रकच्या सहाय्याने होत आहे. या वाहतुकीतील बहुतांश वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने व वाहनांना असलेले इंडिकेटर बंद झाकले गेल्याने मोठया प्रमाणात रस्ते अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. केवळ रिफ्लेक्टर नसल्याने होणाऱ्या अपघातात कुठलीही जीवीत हानी होऊ नये यासाठी या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचे व त्यांना सुव्यवस्थित ठेवण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनाने विशेषत: बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रक इत्यादी वाहनांना समोरील बाजूस पांढऱ्या रंगाचे रिफ्लेक्टीव्ह रेडियम, मागील बाजूस लाल रंगाचे रिफ्लेक्टीव्ह रेडियम, तसेच उर्वरीत बाजुस पिवळ्या रंगाचे रिफ्लेक्टीव्ह रेडियम आपल्या स्तरावर लावण्यात यावेत. जेणेकरुन अंधारात ऊसाची वाहतुक करणाऱ्या वाहनांद्वारे इतर वाहनांचा अथवा याच वाहनांचा अपघात होणार नाही. तसेच वाहनात ऊस भरल्यानंतर पाठीमागे गुणीले (क्रॉस) चिन्ह असलेला फ्लोरेसेंट (चमकणारा) लाल रंगाचा कपडा अडवणे बंधनकारक आहे. असे परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
