Maharshtra News Parbhani News

2021 या वर्षामध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी पंधरा दिवस निश्चित

 

                           

           परभणी, (जिमाका) दि.01 :- ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतेग्रहे, सभाग्रहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्हयाच्या निकडणुसार करण्यासाठी सन 2021 या वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करण्यात आले असून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्यात आली आहे. राज्य शासनाने निश्चित केलेले शिवजयंती, 1 दिवस, ईद-ए-मिलाद 1 दिवस, डॉ.आंबेडकर जयंती 1 दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन 1 दिवस, गणपती उत्सव स्थापना दिवस, दूसरा दिवस, पाचवा दिवस, गौरीविसर्जन व अनंत चर्तूदशी असे एकूण 5 दिवस, नवराञी उत्सव अष्टमी व नवमी असे 2 दिवस, दिवाळी 1 दिवस (लक्ष्मीपूजन), 31 डिसेंबर 1 दिवस, ख्रिसमस 1 दिवस असे एकूण 14 दिवसांसाठी तर उर्वरित एक दिवसासाठी राज्य शासनाच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार ध्वनीची विहीत मर्यादा राखून सवलत दिली जाईल. या आदेशाची अंमलबजावणी या जिल्हयाचे हद्दीपूरती मर्यादीत राहील. असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: