Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यशाळा संपन्न

 

            परभणी,(जिमाका) दि. ०१ :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची माहिती होण्याकरिता आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात  नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

             राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या कार्यवाहीबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर व अप्पर कोषागार अधिकारी सुधाकर सोळंके यांनी या कार्यशाळेस सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते.  हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कोषागार कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: