National News

अर्धापुरात 43 ग्रामपंचायतसाठी 1058 अर्ज वैध, द हा अवैध , चार ग्रामपंचायती बिनविरोध होणार.

अर्धापुरात 43 ग्रामपंचायतसाठी 1058 अर्ज वैध, दहा अवैध , चार ग्रामपंचायती बिनविरोध होणार..

अर्धापूर ( शेख जुबेर ) तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या 141 वार्डातील 377 जागांसाठी प्राप्त झालेल्या एक हजार 68 अर्जापैकी एक हजार 58 अर्ज वैध ठरले आहेत .उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख सोमावारी (ता.चार) असून निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार तर सोनाळा , आमराबाद,आमराबाद तांडा, देळूब खुर्द या गातील जागांसाठी मोजकेच अर्ज आल्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार आहे.तर विरोधी पॅनलचे उमेदवारी अर्ज कसे मागे घेता येईल यासाठी साम ,दाम,दंड ,भेद नितिचा वापर केला जात आहे.तर काही गावात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून 377 जागांसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाणनी करण्यात आली यात दहा उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहे. ग्रामपंचायत निहाय जागा छाणनी मध्ये वैध ठरलेले उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे आहेत. कंसातला आकडा उमेदवारी अर्जांचा आहे. चोरंबा 9( 30 ), रोडगी सात ( 15) ),सोनाळा सात (सात ), चाभरा 11(36 ),बामणी नऊ ( 27 ), मेंढला खुर्द सात (17) , मेंढला बुद्रूक सात ( 15 ), जांभरून सात ( 17 ), लहान 13 ( 43 ),आंबेगाव सात ( 26), बेलसर सात ( 32), शाहपूर सात ( 10), बारसगाव नऊ ( 31 ), येळेगाव 13 ( 45 ) आमरबाद तांडा सात (पाच) , आमराबाद सात (चार),गणपूर सात ( 33 ), कामठा 13 (59 ), सांगवी सात ( 15 ), मालेगाव 15 ( 69), भोगाव सात (15) ,उमरी नऊ ( 23),पाटणूर नऊ (27 ),चनापूर नऊ ( 22 ) लोणी बुद्रूक नऊ ( 43 ), लोणी खुर्द नऊ ( 18 ), पांगरी सात ( 19 ), सावरगाव नऊ( 19) ),धामदरी सात (21 ) दिग्रस सात (16 ),दाभड नऊ( 29 ), शैलगाव बुद्रूक सात ( 26 )शैलगाव खुर्द सात ( 13 ), पार्डी 11( 26 ),पिंपळगाव 11( 27 ),देगाव बुद्रूक नऊ (21 ),शेणी नऊ (32 ),देळूब खुर्द सात (पाच ) देळूब बुद्रूक नऊ ( 28), कोंढा नऊ ( 34 ),निमगाव 11( 33), खैरगाव खुर्द व बुद्रूक सात(17) , खैरगाव सात (दहा) या प्रमाणे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करणे , प्राप्त झालेल्या अर्जांची छाणनी करणे हे महत्त्वाचे दोन टप्पे पुर्ण झाले आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवारी (ता चार) आहे.निवडणुकीचे खरे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आसले तरी दोन पॅनल मध्येच लढती रंगणार आहेत.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: