Nanded Marathi News

नांदेड :महानगरपालिका नांदेडकरांना खड्ड्यातून कधी मुक्त करणार’ नगरसेविका वैशालीताई मिलिंद देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

नांदेड :28. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असतानाही नांदेडकरांना महानगरपालिकेने मूलभूत सोयी सुविधांपासून दूर ठेवले आहे. एवढेच नाही तर शहरातील असंख्य रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही खड्डे बुजविण्याचे काम महानगरपालिका करता नाही. त्यामुळे नांदेड सध्या खड्ड्यात अडकले आहे. असे असतानाही महानगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेऊन काम करत आहे. मनपा नांदेडकरांना खड्ड्यातून बाहेर कधी काढणार असा सवाल नगरसेविका वैशालीताई मिलिंद देशमुख यांनी महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

तत्कालीन परिस्थितीत राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार होते . राज्यात विकासाची गंगा सुसाट सुरू असताना नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या त्यावेळी काँग्रेसने निवडणुकीत नांदेडकरांना आश्वासनाच्या खोट्या भूलथापा मारून प्रचंड बहुमत मिळवले . 73 नगरसेवक असलेल्या नांदेड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना नांदेडकरांना मात्र मूलभूत सोयी सुविधा पुरवतात आल्या नाहीत . शहरातील अनेक भागात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे . बाफना ते रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हा प्रश्न या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहनचालकांसमोर अगदी सहज निर्माण होतो .

एवढेच नाही तर शहरातील अनेक मार्गावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत . महानगरपालिका प्रशासनाला शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम करता येऊ नये इतकी केविलवाणी परिस्थिती पहावसं मिळते. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने पाच वर्षे चार महापौर बदलून विकासाला जाणीवपूर्वक खीळ घातली. त्यामुळे कोणत्याही महापौर शहर विकासाचा सुत सापडला नाही.शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरलेल्या नेतृत्वाने पक्षाचे कार्यकर्ते खुश ठेवण्यासाठी सत्तेचा खेळखंडोबा केला आहे. पाच वर्षाचा कलावधी संपत आला असताना मूलभूत सुविधा कधी उपलब्ध करणार, नांदेडकरांना खड्ड्यातून बाहेर कधी काढणार आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी करणार असा सवाल एवढेच नव्हे नगरसेविका वैशालीताई मिलिंद देशमुख यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नांदेडच्या जनतेनी आता तरी आपले डोळे उघडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांना जाब विचारावा असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: