
शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्त्र परवाने ज्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात येत आहे. अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा. परवानाधारकाने दिनांक 21 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नुतनीकरण शुल्क (चलनाने) शासन जमा करावे.
आपले शस्त्र परवान्यातील असलेले अग्निशस्त्राची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करुन विहित नमुन्यातील अर्ज, जन्म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्त्र परवाना सेतू समिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दाखल करावा. जिल्हयातील शस्त्र परवाना धारक व सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
000000
