
परभणी, दि. 19:- राज्य विडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये जिल्हयातील 566 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज, नमुना-15 अ चे प्रमाणपत्र निवडणूक प्राधिकारी यांची सही व शिक्यासह देण्यात यावेत. अर्जदाराचे मूळ व छायाकिंत जातीचे प्रमाणपत्र, नमुना-3 मध्ये 100 रुपयाच्या बॉण्डपेपरवर शपथपत्र, नमुना 21 मध्ये शंभर रुपयांचे बॉण्डपेपरवर शपथपत्र व जातीचा दावा सिध्द करणारे शालेय किंवा महसुली इतर सक्षम पुरावे सोबत जोडावीत महिला उमेदवारांकरिता त्यांच्या वडीलाकडील किंवा माहेराकडील जातीचे मूळ व छायांकित जात प्रमाणपत्र अपलोड करुन ऑनलाईन सादर करावेत. त्यानंतर याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकारी यांचेमार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयाकडे प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करावेत जुन्या पध्दतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी परभणी यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-
वृत्त क्र. 378 दि. 19 डिसेंबर, 2020
31 डिसेंबर पर्यंत क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियानाचे आयोजन
परभणी, दि. 19:-जिल्हयात 1 डिसेंबर पासून क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान (ACF & LCDC) 2020-21 अंतर्गत आशा व पुरुष स्वंसेवकांच्यामार्फत घरोघरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. संशयीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधुन त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे अभियान 31 डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुगणालय, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व विभागांची दिनांक 16 डिसेंबर रोजी आढावा बैठक उपसंचालक आरोग्य सेवा औरंगाबाद परिमंडळ औरंगाबाद डॉ. स्वप्निल लाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद शंकर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विद्या सरपे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस तसेच सर्व जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-
