Maharshtra News Nanded News

 दहावी,…

 

दहावी, बारावी परीक्षा अर्जातील

माहितीच्या अनुषंगाने शिक्षण मंडळाकडून खुलासा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य शिक्षण मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून हिंदू शब्द वगळल्याबाबतच्या काही बातम्या विविध प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने राज्य शिक्षाण मंडळाकडून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधीत माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने भरुन घेण्यात येतात. या आवेदनपत्रामध्ये विविध माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये Minority Religion अल्पसंख्याक धर्म हा रकाना सन 2014 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन या Minority Religion अल्पसंख्याक धर्माचा उपरकान्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी Non-Minority  अल्पसंख्याक इतरहा रकाना सन 2014 पासूनच समाविष्ट करण्यात आलेला आहे. तेंव्हापासून याबाबतची प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जामध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरुन घेण्यात येत आहे.

 

सन 2013 मध्ये अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी तसेच अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र शासन यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा तपशील मंडळाकडे मागितला. मंडळाच्या परीक्षा समितीच्या दिनांक 7 सप्टेंबर 2013 च्या सभेतील विषय क्रमांक 54 अंतर्गत झालेल्या ठरावान्वये उपरोक्त उपरकान्यांचा समावेश परीक्षा फॉर्ममध्ये करण्यात आलेला आहे. या रकान्यात नमूद केलेले मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन हे अल्पसंख्यांक समुदाय महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मंडळाच्या आवेदनपत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना या रकान्यातील माहिती भरण्यासाठी Non – Minority अल्पसंख्याक हा रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या रकान्यातील माहितीचा उपयोग उपरोक्त नमूद केलेल्या कारणांसाठी करण्यात येतो. सदर माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येत नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: