Maharshtra News Parbhani News

कृषीविषयक योजनांसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

 

            परभणी, दि. 17 :- कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने विशेष योजना हाती घेतला आहे. यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेती निगडीत विविध बाबींकरिता शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.

            योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक राहील. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्रच्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून अर्ज करता येईल. अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये  शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी 31 डिसेंबर 2020 पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. सर्व इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन कृषि आयुक्त, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

  

जिल्ह्यात क्रीडा सप्ताहानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

 

       परभणी दि.17 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व जिल्ह्यातील विविध एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने             12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 डिसेंबर रोजी  बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत विविध वजनी गटामध्ये खेळाडूनी विजय मिळवला आहे. ४६ ते ४९ किलो वजनी गटामध्ये-पल्लवी डोंगरे, ४९ ते ५२ किलो वजनी गटामध्ये-मुक्ता कनकुटे, ५२ ते ५६ किलो वजनी गटामध्ये-सांची गायकवाड, ५६ ते ६० किलो वजनी गटामध्ये-मोनाली धनगर, ६० ते ६४ किलो वजनी गटामध्ये-एकता गायकवाड, ६४ ते ६९ किलो वजनी गटामध्ये- ऋतुजा भालेराव, ६९ ते ७५ किलो वजनी गटामध्ये- प्रियंका भारसाखळे, ७५ ते ८१किलो वजनी गटामध्ये-दिव्या कांबळे, ८१ ते ९१ किलो वजनी गटामध्ये- सायली लांडगे, ९१ किलो वजनी गटामध्ये- ऋतुजा ठोबरे यांनी विजय मिळविला आहे. 13 डिसेंबर रोजी बॅडमिंटन या स्पर्धेचे आयोजन केले होते. बॅडमिंटन निकालामध्ये प्रथम- आर्यवीर देशमुख, द्वितीय- अजिंक्य गाडेकर, तृतीय- अविनाश देशमुख यांनी विजय संपदान केला आहे. या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बॉक्सिंग प्रशिक्षक तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले आहेत.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: