Maharshtra News Parbhani News

महाडीबीटी पोर्टलवर नविन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आवाहन

      

परभणी ,दि.15(जि.मा.का):-जिल्हयातील सर्व शासनमान्य मान्यता प्राप्त अनुदानित /कायम विना अनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनूसूचित जाती ,विमुक्त जाती, भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांनी सन 2019-20 पासून महाराष्टृ शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यव्रत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे एकत्रित संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.महाराष्टृ शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती / शिक्षण शूल्क व परिक्षा शूल्क / विद्यावेतन व इतर योजनांचा लाभ वितरीत करण्यात येतो.तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी  महाडीबीटी  पोर्टल दिनांक 3.12.2020पासून सूरू करण्यात आले आहे जिल्हयातील प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनूसुचित जाती,विमुक्त जाती ,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष् मागासप्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती / शिक्षण श्ूल्क व परिक्षा शूल्क / विद्यावेतन व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरण्याचे  आवाहन सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण,परभणी यांनी केले आहे.

                                                *******

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: