Maharshtra News Parbhani News

जिल्हयातील 4 दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुरु

 

परभणी, दि. 9 –  सध्या नोंदणी व मूद्रांक विभागात मूद्रांक शूल्कात डिसेंबर -2020 पर्यंत सवलत दिली असल्यामूळे दूय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे प्रमाण वाढलेले आहे व सदर सवलतीचा फायदा सर्वसामान्य जनतेला घेता यावा यासाठी या कार्यालयाच्या अधिनस्त असलेले परभणी जिल्हयातील 4 दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुरु रहाणार आहेत.

 सह दूय्यम निबंधक श्रेणी वर्ग-2,परभणी -1,दूय्यम निबंधक श्रेणी -1जिंतूर ,दुय्यम निबंधक श्रेणी-1पूर्णा व दूय्यम निबंधक श्रेणी -1गंगाखेड ही कार्यालये सूटटीच्या दिवशी म्हणजेच या महिन्याच्या प्रत्येक शनिवारी दि.12,19 व 26 रोजी सूरू असणार आहे. असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, परभणी संजय बी. पाटील यांनी एका परित्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-*-* 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: