Nanded Marathi News

नांदेड:डावी लोकशाही आघाडी व संघटनांचा सत्याग्रह

नांदेड/प्रतिनिधी-केंद्र सरकारने शेतकर्‍यांवर लादलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, कामगार कायद्यातील मालक धार्जीने कलम रद्द करावेत या मागणीसाठी व शेतकरी संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डावी लोकशाही आघाडी व समविचारी संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या सत्याग्रहास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकार शेतकर्‍यांची कुठलीही मागणी मान्य करण्यास तयार नसल्याने देशभरातील शेतकरी संघटनांच्या कृती समितीने मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

या भारत बंदला डाव्या आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), जनता दल आदी पक्षांसह मोव्हमेंट फॉर पिस ऍण्ड जस्टीज, तंजीम-ए-इन्साफ सह विविध कामगार व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डावी लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (से.), लाल निशाण, भाकपा (मा.ले.रेडस्टार), तंजीम-ए-इन्साफ, अंनिस, अल्प पेन्शन धारक संघटना, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, एमपीजे आदी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे, ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. विजय गाभणे, प्रा. लक्ष्मण शिंदे, कॉ. देवराव आईलवाड, कॉ. बी. झेड एडके, कॉ.एम. आर. जाधव, प्रा.राजू सोनसळे, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष रियाज उल हसन अमेर, अविनाश भोसीकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे लक्ष्मण नरमवार आदींनी यावेळी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी डॉ.पी.डी. जोशी पाटोदेकर, अलताफ हुसेन, कॉ. के.के.जामकर, फेरोज गाजी, कॉ.गंगाधर गायकवाड, डॉ.किरण चिद्रावार, सुर्यकांत वाणी, कॉ. उज्ज्वला पडलवार, भाकपा (यु) चे प्रा. सदाशिव भुयारे, तंजीम-ए-इन्साफचे अब्दुल बशीर, कॉ.बी. के.पांचाळ, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ.पद्मा तुम्मा, कॉ. कलावती कोंडप्पा, कॉ. शारदा गुरुपवार यांच्यासह शेतकरी, विडी कामगार, कर्मचारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: