Maharshtra News Nanded News

नांदेड : 17 तंबाखू विक्रेत्यावर कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्षास प्राप्त तक्रारीवर पथकामार्फत 5 डिसेंबर रोजी मुसलमानवाडी पाटी, स्वारातीम विद्यापीठ गेट व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेट येथे अचानक धाडी टाकून 17 तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करुन 12 हजार 900 रुपये दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील मुजळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कोरोना संक्रमनाचा धोका वाढतो. स्वारातीम विद्यापीठ गेट व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेट तसेच मुसलमानवाडी पाटी परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात नोडल अधिकारी डॉ. पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. अर्चना तिवारी , मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक श्री पठाण आदी होते.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: