परभणी, दि.19 :-निवडणूक पत्रक व भित्तीपत्रक इत्यादी छपाई करण्यासाठी प्रकाशकाने  स्वत:च्या सहीने अधिकथन परिशिष्ट अ मध्ये मुद्रकाला दोन प्रतीमध्ये देणे आवश्यक आहे. आणि परिशिष्ट ब मध्ये निवडणूकीकरीता छपाई केलेल्या पोस्टर भित्तीपत्रक इत्यादीची माहिती मुद्रक यांनी जिल्हाधिकारी यांना दोन प्रतीत त्वरीत देणे बंधनकार आहे. तरी सर्व प्रिंटींग प्रेसधारकांनी याबाबतीत अधिक माहितीकरीता आणि प्रतिज्ञा पत्राकरीता जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील गृह शाखेस संपर्क साधावा. कोणीही मुद्रक कलम 127 अ चे उल्लंघन करुन 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांच्याकरीता छपाई करुन देतील त्यांच्याविरुध्द अधिनियमातील तरतूदीनूसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-