
परभणी, दि.19:- जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर ,सुरेश पुंड, मारोती पुरणवाड,एकनाथ मुजमुले, उमेश शिंदे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
