
परभणी, दि. 3 :- पाच टक्के जिल्हा परिषद सेस निधीमधून सन 2020-21 या वर्षात दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेसाठी तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज उपलब्ध झाले असून परिपूर्ण अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समितीकडे दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
