Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात बाल संरक्षण कक्षाअंतर्गत समर्पित कक्ष सुरु

 

 

परभणी, दि. 3 :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कल्याणनगर परभणी येथे बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाअंतर्गत समर्पित कक्ष सुरु करण्यात आला आहे.

बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती व अनुदानाचा विशेष लाभ मिळत नाही. त्यामुळे आजही समाजातील अनाथ मुले अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजापासून वंचित आहेत. समाजात पालकाशिवाय व योग्य त्या निवाऱ्यापासून अनाथ बालके दूर आहेत. त्यांना त्यांचे हक्क आणि जगण्याची समान संधी मिळवून देण्यासाठी शासनाने अनाथ बालकांसाठी अनाथ प्रमाणपत्र वाटपाचा संकल्प केला आहे. अधिक माहितीसाठी समर्पित कक्षाचे संरक्षण अधिकारी (संस्थात्मक काळजी) श्रीमती अर्चना मेश्राम, संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) श्रीमती आम्रपाली पाचपुंजे,  सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साळवी, मिलिंद कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: