Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्ह्यातील शाळा 2 डिसेंबर पासून सुरु – जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर

परभणी, दि. 23 :-  परभणी मनपा क्षेत्र वगळता संपूर्ण परभणी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने प्रथम वर्ग दहावी ते बारावी तदनंतर नववी व अकरावी दि.2 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात येतील.  तसेच परभणी मनपा क्षेत्रात वर्ग सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणीकरीता स्वॅब दिलेला आहे परंतू त्याचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे दि.23 नोव्हेंबर, 2020 पासून इयत्ता नववी व बारावी वर्ग सुरु करणे स्थानिक प्रशासनाला शक्य होत नाही. परभणी मनपा क्षेत्र वगळता संपूर्ण परभणी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने प्रथम दहावी व बारावी तदनंतर नववी व अकरावी वर्ग याप्रमाणे दि.2 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात येतील.  तसेच परभणी मनपा क्षेत्रात वर्ग सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.  दि.25 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील 100 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विद्यार्थी उपस्थितीकरीता पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे, तसेच शासन निर्णयानूसार शाळेत प्रत्यक्ष उपस्थितीकरीता संमती नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन वर्ग सुरु ठेवावेत. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. दि.26 नोव्हेंबर पूर्वी शाळेचे निर्जंतुकीकरण करावे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यास ती शाळा 5 दिवस बंद ठेवून निर्जंतुकीकरण करुन परत चालू करण्यात यावी. शाळेत हॅन्डवॉश मशीन, थर्मल गन, ऑक्सिमीटर उपलब्ध करणे व पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. आठवड्यातून किमान 2 वेळा संपूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करणे शाळा व्यवस्थापनास बंधनकारक असेल. तसेच शाळा सुरु झाल्यास मानव विकास बस प्रवास फेऱ्या पूर्व नियोजनानुसार सुरु करण्यात याव्यात. तसेच कोविड-19 बाबतच्या सर्व सूचनांचे व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच हयगय केल्यास प्रचलित कायद्यान्वये कार्यवाही केली जाईल, अशा सूचना जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: