Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

संघ‍ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

परभणी, दि. 24 :- अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणारे आहेत. अशा विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी एकावेळी एकरकमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी ई-मेलद्वारे दि. 8 डिसेंबर, 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणासाठी (युपीएससी) दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 ही दि. 4 ऑक्टोबर, 2020 रोजी घेण्यात आली व या परीक्षेचा निकाल दि. 23 ऑक्टोबर, 2020 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. बार्टीकडून मुख्य परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळास भेट देवून पात्रतेचे स्वरुप तपासून अर्ज डाऊनलोड करावा व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर दि. 8 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठवावा, असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: