Maharshtra News Parbhani News

जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम

परभणी, दि. 24 :- जिल्ह्यातील माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, संपलेल्या एकूण 566 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमानुसार शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर, 2020 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक आहे. मंगळवार, दि. 1 डिसेंबर, 2020 रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 1 ते गुरुवार दि. 7 डिसेंबर, 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी असेल तर गुरुवार, दि. 10 डिसेंबर, 2020 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी कळविले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: