Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 28 कोरोना…

 

28 कोरोना बाधितांची भर तर

23 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 23 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या एकुण 1 हजार 37 अहवालापैकी 973 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता20 हजार 388 एवढी झाली असून यातील 19 हजार 257 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 388 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 549 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5, भोकर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, मुखेड तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1 असे एकूण 23 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 2, किनवट 2 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, माहूर तालुक्यात 1, देगलूर 1, मुखेड 1 असे एकुण 13 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 388 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 34, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 34, मुखेड कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 86, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, खाजगी रुग्णालय 34 आहेत. 

सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 169, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 52 हजार 34

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 26 हजार 898

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 388

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 257

एकूण मृत्यू संख्या- 549

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-437

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-388

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: