Nanded Marathi News

नांदेड :राज्यराणी, देवगिरी एक्सप्रेस 3 व 5 डिसेंबरपासून सुरु होणार

नांदेड : कोरोना प्रादुर्भावात बंद झालेल्या सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस व नांदेड -मुंबई राज्यराणी एक्सप्रेस सुरु करणे संदर्भात जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांच्याकडे मागणी केली होती. त्याप्रमाणे दि.3 डिसेंबरपासून राज्यराणी एक्सप्रेस नांदेड-मुंबई ही रेल्वे गाडी सुरु होत आहे. तसेच सिकंदराबादहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस दि.5 डिसेंबरपासून होत आहे. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कळविले आहे.

नांदेड येथून मुंबईसाठी जाणा-या प्रवाशांची गैरसोय दुर करण्यासंदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे नांदेड येथून राज्यराणी एक्सप्रेस सुरु करणे संदर्भात खा.चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले. व मनमाडवरुन मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस मनमाड ऐवजी नांदेडवरुन सुरु झाली. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी 4 रेल्वे गाड्याची उपलब्धता नांदेडवासीयांना झाली. परंतु कोविड प्रादुर्भावामुळे सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. त्या नव्याने सुरु करण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली.
त्यानुसार नंदिग्राम विशेष रेल्वे सुरु झाली. व त्याप्रमाणे आता राज्यराणी व देवगिरी एक्सप्रेस सुरु होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, लातूर, जालना या जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दुर होणार आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: