Nanded Marathi News

नांदेड: 58 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू  36 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- बुधवार 25 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या एकुण 1 हजार 895 अहवालापैकी 1 हजार 811 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 161 एवढी झाली असून यातील 19 हजार 16 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 407 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 हदगाव तालुक्यातील कामारी येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालयात तर बुधवार 25 नोव्हेंबर 2020 मुखेड फुलेनगर येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा मुखेड कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 547 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 24, मुखेड कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 5, हदगाव कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, धर्माबाद कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 4 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 14, किनवट तालुक्यात 4, मुखेड 2, हदगाव 1, हिमायतनगर 1, भोकर 3, लोहा 1, नायगाव 1, उमरी 1, परभणी असे एकुण 29 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, माहूर तालुक्यात 1, कंधार 1, मुखेड 2, देगलूर 2, हदगाव 12, औरंगाबाद 1, उत्तरप्रदेश राज्यातील 1 असे एकुण 29 बाधित आढळले.

जिल्ह्यात 407 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 42, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 19, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 68, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 141, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 52 आहेत.

बुधवार 25 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 43 हजार 840
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 19 हजार 754
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 161
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 16
एकूण मृत्यू संख्या- 547
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-14
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-487
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-407
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: