Maharshtra Marathi News

Mumbai Delhi Flights: मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा थांबवणार!; राज्य सरकार उचलणार ‘हे’ मोठे पाऊल

मुंबई: दिल्लीत करोना संसर्गाची दुसरी लाट धडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार सतर्क झालं असून दिल्लीशी तूर्त संपर्क तोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. ( Mumbai Delhi Flights and Trains Latest News Updates )

मुंबईने करोनाचा क्रूर चेहरा पाहिलेला आहे. मुंबई देशातील करोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला होता. हे संकट हळूहळू दूर होत असताना व स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली असताना दिल्लीत आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबईकरांचीही धाकधूक वाढली आहे. त्यात आधीच दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली जात आहेत. त्यातूनच दिल्ली-मुंबई प्रवास तूर्त बंद केला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: