National News

शैक्षणिक प्रगती करून महिलांनी स्वावलंबी व्हावे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे. आत्महत् याग्रस्त शेतकरी कुटूंबांची पुण्याच्या मामा ंच्या उपस्थित भाऊबीज साजरी, शेतकरी कुटूंब भा रावले

शैक्षणिक प्रगती करून महिलांनी स्वावलंबी व्हावे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांची पुण्याच्या मामांच्या उपस्थित भाऊबीज साजरी, शेतकरी कुटूंब भारावले

अर्धापूर ता 18 (शेख जुबेर) शिक्षणामुळे सर्वांगीन विकास होत आसतो.कुटूंबात ऐखादी अनुचित घटना घडल्याने त्या कुटुंबाची खूप मोठी हानी होते.या संकटावर मात करून आपल्या पाल्यांचे चांगले शिक्षण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.महिलांनी शैक्षणिक प्रगती करून स्वावलंबी व्हावे.शेतकरी कुटूंबा सोबत भाऊबीज साजरी करणे हा चांगला उपक्रम आहे.असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी बुधवारी (ता 18) केले.भोई प्रतिष्ठान पुणे ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व श्री संत पाचलेगाकर महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या संयुक्त सहकार्यातून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबां सोबत भाऊबीजचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकरी कुटूंब भारावून गेले.

पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबाला शैक्षणिक अधार मिळावा यासाठी पुण्यजागर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमातून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात येते.तसेच हे शेतकरी कुटूंब दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी दहा दिवस पुण्यातील विविध कुटुंबात रममाण होत आसतात.पण यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पुण्यात साजरी न करता आल्यामुळे बच्चेकंपनीला थोडी हुरहूर लागली होती.

नांदेड येथील श्री संत पाचलेगाकर महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या सभागृहात यंदा भाऊबीज आयोजन करण्यात आली होती.या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, गोदावरी अर्बणचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, अतिरिक्त पोलीस अधिकक्ष निलेश मोरे, शिक्षण उपसंचालक अनिल गुंजाळ, भोई प्रतिष्ठानचे आध्यक्ष डाॅ मिलिंद भोई , बालाजी गव्हाने , सुधाकर टाक, चंद्रकांत पाटील,, दत्तोपंत डहाळे, गयाबाई लांगे , रूपेश पाडमुख आदी उपस्थित होते.

अत्महात्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नींनी यंदा दहावीची परीक्षा दिली होती.यात लक्ष्मी साखरे उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यांचा विशेष सत्कार पोलीस अधीक्षकांच्या हास्ते करण्यात आला.तसेच आश्रयमाच्या वतीने शिलाई यंत्र देण्यात आले.तर उपस्थित सर्व शेतकरी कुटूंबाला अकाश कंदील,फराळ, साडी चोळी , दिवे, फुलांचे तोरण आदी भेट वस्तू देण्यात आल्या.

गोदावरी अर्बण पतसंस्थेने रोजगार करू ईच्छीणार-या हाजारो उद्योजकांना अर्थसाह्य करून अर्थिक स्वलंबी केले आहे.आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्य नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पुढे आल्यास पतसंस्था सर्वोपरी मदत करील आशी ग्वाही धनंजय तांबेकर यांनी दिली.तसेच या शेतकरी कुटूंबाला 51 हजाराची मदत जाहीर.तसेच या कुटुंबाचा पाठीशी भक्कमपणे उभे राहू आसे सांगितलं.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागोराव भांगे ,गुणवंत विरकर शेख साबेर , गजानन मेटकर दत्ता टोकलवाड यांनी पुढाकार घेतला.यावेळी केशव दादजवार , साईनाथ शेट्टोड , सुरेश वळसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत मुळे यांनी केले तर आभार दिगांबर मोळके यांनी मानले.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: