National News

अर्धापूरातील लाॅन्ड्री चालकाचा असाही प्र ामाणिकपणा. ग्राहकाचे पस्तीस हजार रुपये केले परत

अर्धापूरातील लाॅन्ड्री चालकाचा असाही प्रामाणिकपणा.
● ग्राहकाचे पस्तीस हजार रुपये केले परत

अर्धापूर ( शेख जुबेर )
अधुनिक काळात चालता – बोलता हातोहात फसवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशाही परिस्थितीत अर्धापूर शहरातील एका लाॅन्ड्री चालकाने ग्राहकाच्या कपड्यांच्या खिशात सापडलेले पस्तीस हजार रुपये ग्राहकाला परत करून आपल्यातील प्रामाणिकपणा जपला आहे.
□ अर्धापूर शहरातील परिट समाजाचे मारोती मुधळे हे लहानपणापासुन लाॅन्ड्री चालकाचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून दररोज मिळालेल्या २५० ते ३०० रूपयात आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवतात. नित्यनेमाने लाॅन्ड्रीचे काम सुरू असताना दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी भिमराव खिल्लारे हे लाँड्रीसाठी कपडे टाकून घरी निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत मारोती मुधळे हे कपड्यांना इस्त्री करित असताना याच कपड्यातील पॅन्टच्या खिशात नजरचुकीने ठेवण्यात आलेले ३५ हजार रुपये त्यांना सापडले. ही रक्कम पाहून त्यांनी लगेच भिमराव खिल्लारे यांना संपर्क साधून पत्रकारांच्या साक्षीने ही संपूर्ण रक्कम त्यांना परत केली. अशाच प्रकारे मागील चार – पाच वर्षापूर्वी त्यांचे वडील बंधु स्वर्गीय नारायण मुधळे यांनी सुध्दा एका ग्राहकाच्या कपड्यातील खिशात सापडलेले ७ हजार रुपये परत केले होते.
□ सध्याच्या बेभरवशा, बनवाबनवी आणि पदोपदी फसवणूक होत असलेल्या कलीयुगात आजही मारोती मुधळे सारखे काही प्रामाणिक व्यक्ती समाजात सापडतात यावरून निवडक माणसातील माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय या प्रसंगातुन दिसुन येतो. मुधळे परिवारातील प्रामाणिक पणाची संपुर्ण परिसरातुन प्रशंसा होत आहे. मारोती मुधळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पत्रकार निळकंठ मदने, सखाराम क्षीरसागर, गोविंद टेकाळे, अँड. सचिन देशमुख, शिक्षक गुलाबराव मदने, राजकुमार मदने, शेख साजीद, भगवान हांडे, शंकर घुक्कसे आदि सुज्ञ नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. तर मारोती मुधळे यांनी खिशात सापडलेली रक्कम परत केल्याबद्दल भीमराव खिल्लारे यांनी त्यांना बक्षीसरूपी भेट दिली. लाॅन्ड्री चालकांच्या या प्रमाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: