National News

कुल जमाती तहेरीक अर्धापूर च्या वतीने तहसी लदार यांना निवेदन देण्यात आले फ्रांन्स मधी ल त्या घटनेचा अर्धापूरात निषेध

कुल जमाती तहेरीक अर्धापूर च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
फ्रांन्स मधील त्या घटनेचा अर्धापूरात निषेध
अर्धापूर ( शेख जुबेर ) फ्रांन्स देशात ईस्लाम धर्म व महम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या घटनेचा अर्धापूरात मंगळवारी मुस्लिम नेत्यांनी जाहीर निषेध केला असून,तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे.
फ्रांन्स देशात इस्लाम व गुरुंचा अवमान केला ,त्या घटनेचा मंगळवारी अर्धापूर शहरातील मुस्लिम नेत्यासह कार्यकत्यांनी निषेध करुन तहसीलदार सुजीत नरहरे मार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.निवेदणात फ्रांन्स मधील घटनेचा सखोल उल्लेख करुन निषेध केला,या निवेदनावर नगरसेवक मिर्झा अख्तरऊल्ला बेग,म. सुलतान म.ईस्माईल,गाजी काजी,मुसव्वीर खतीब,सय्यद फिरदोस हुसैनी,हैदर जमाल,सुलेमान,शाहबाज पठाण,सय्यद नजीर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: