National News

लग्न समारंभासाठी मर्यादा वाढवणार? राजेश टोपे यांनी दिले संकेत

मुंबईः राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी अटी व शर्तीसह ५० लोकांना परवानगी देण्यात आली होती. आता मात्र लवकरच या संख्येत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगीन अंतर्गंत अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. लग्न समारंभाचे आयोजन मंगल कार्यालयात करण्याची परवानगी राज्य शासनाकडून यापूर्वीच देण्यात आली होती. ५० जणांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर पाळून मंगलकार्यालयात लग्न सोहळ्याचे आयोजन याआधी करता येत होते. मात्र आता या संख्येत अधिक वाढ करण्याचा विचार सरकार करत आहेत. दिवाळीनंतर यावर सरकार निर्णय घेणार असल्याचं, राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दिवाळीनंतर राज्यात लग्न कार्यांना सुरुवात होती. मागील वर्षी ऐन मार्च महिन्यातच करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानं अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले होते. त्यामुळं या दिवाळीनंतर लग्न सोहळ्याची लगबग सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर सरकारने याबाबत निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

‘ अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली सरकारने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांना पालन करावे. मास्क वापरणं गरजेचं आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क महत्त्वाचं असणार आहे,’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: