National News

राष्ट्रीय एकता दिवसानिमित रासेयोच्या व तीने कोरोना योध्दांचा सत्कार

राष्ट्रीय एकता दिवसानिमित
रासेयोच्या वतीने कोरोना योध्दांचा सत्कार

अर्धापूर ( शेख जुबेर ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर,च्या राष्ट्रीय सेवा योजना पथक,डॉ.शंकरराव चव्हाण व्याख्यानमाला व पोलिस स्टेशन, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.मंचावर ग्रंथपाल मधुकर बोरसे, पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, पो.उपनिरिक्षक बी.व्हि.राठोड, पो.उपनिरिक्षक एस.के.सुरवसे, पो.उपनिरिक्षक के.के.मांगुळकर, स्वच्छता निरीक्षक मदन डाके, प्रा. सदाशिव भूयारे,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रघुनाथ शेटे उपस्थित होते.
राष्ट्रीय एकता दिनी सहभागींना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ प्रा रघुनाथ शेटे यांनी दिली. या निमित्ताने कोरोना काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केले अशा कोरोना योध्याचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. या मध्ये पोलीस विभागातील एएसआय विद्यासागर वैद्य, पोलीस हवालदार परमेश्वर कदम, एन.बी.रघुवंशी, किशोर पाटील, जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षक शेख जावेद, आर. पी. पावडे,अंगणवाडी सेविका धम्मज्योति सरोदे, अंजली साबळे, शिवनंदा टोंम्पे, रेखा कठोड, स्वच्छता दूत आनंदा खंडागळे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक अमोल सरोदे या योध्याना निमंत्रित करून यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले आपत्कालीन प्रसंगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतींर केला जातो विशेष म्हणजे आज राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्य निमित्त करून राष्ट्रीय कार्य केले आहे. ते पुढे बोलतांना म्हणाले की सत्कार हा कार्याला प्रेरणा देणारा असतो . यातून आम्हाला अजून कार्य करण्यासाठी बळ मिळाले आहे.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक एस. के.सुरवसे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले संकटात ते कार्य करतात तेच खरे योध्ये असतात.आणि या योध्याचा सत्कार करून त्यांच्या कार्याला महाविद्यालयाने बळ दिले.
स्वच्छता निरीक्षक मदन डाके यांनी कोविड काळातील आपले अनुभव व्यक्त केले. अंजली साबळे या अंगणवाडी सेविका यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी वीस कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सदाशिव भूयारे,यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रघुनाथ शेटे
यांनी केले.तर आभार प्रा. डॉ. साईनाथ शेटोड यांनी मानले.
कार्यक्रमासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. के. एल. केंद्र,बी. के. गायकवाड , बालाजी पंदीलवाद , मारोती शिंदे,अवधुत्वार पोश्टटी,सदाशिव शिनगारे रासेयो स्वयंसेवक अमोल सरोदे यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी ,पोलिस ठाण्याचे कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: