Parbhani Hindi News

पालम :मौजे पेठशिवणी येथे शासकीय जागेवर पालम तालुक्यासाठी आ.रत्नाकर गुट्टे यांनी एमआयडीसी निर्माण करावी- आनीस भाई खुरेशी

पालम :तालुक्यातील मौजे पेठशिवणी येथे शासनाची मोठ्याप्रमाणावर जमीन असून मौजे पेठशिवणी येथे आ.रत्नाकर गुट्टे यांनी भव्यदिव्य एमआयडीसी निर्माण करावी असे खुले आव्हान पत्रकार अनिस भाई खुरेशी यांनी केली आहे. पालम तालुका हा ऐतिहासिक तालुका असून निजाम काळातही तालुक्याचे मुख्य ठिकाण होते.निजाम सरकारची व्यक्तीक मालकीची हजारो एक्कर शेत जमीन आहेत.
निजाम त्या जमीनीच्या उत्पनातुन व्यक्तीक खर्च करीत असे परंतु मराठवाडा मुक्तिसंग्राम नंतर राजकीय षड्यंत्र रचून पालम शहरातील तहसील कार्यालय गंगाखेड येथे चोरून गंगाखेडला पालमचा दर्जा दिला.पालमचा तालुक्याचा दर्जा काढून गंगाखेडला दिला गेल्यामुळे पालम शहरातील विविध धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन संघर्ष करून 1992 ला पालम शहराला तालुक्याचा दर्जा पुन्हा मिळविला पालम तालुक्या महाराष्ट्र राज्यात निर्माण झाल्या पासून आजपर्यंत कोणतेही मोठे उद्योग मोठे प्रकल्प पालम तालुक्यात दिसत नाही हा एक राजकीय षड्यंत्र म्हणावा लागेल.
पालम तालुका गेल्या अनेक वर्षापासून अविकसीत तालुका राहिलेला आहे. वास्तविक पाहता पालम तालुका चार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावर आहे. पालम तालुक्यातून चारही जिल्ह्याचे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या जवळ असून पालम तालुक्यात शासनाने एमआयडीसी निर्माण करावी पालम तालुक्यात विकासाची गंगा येण्यास वेळ लागणार नाही यासाठी 97 पालम विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पुढाकार घेऊन पालम तालुक्यासाठी एमआयडीसी मौजे पेठशिवणी येथे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे खुले आव्हान पुरोगामी पत्रकार संघाचे पालम तालुका कार्याध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांनी केले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: