Nanded Marathi News

आता दहावीनंतरही घेता येणार सी.ए. साठी प्रवेश

नांदेड(प्रतिनिधी)-दि.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाटंटस्‌ ऑफ इंडियाद्वारे घेण्यात ये’णाऱ्या सीए परिक्षेसाठी आता दहावी नंतरही प्रवेश घेण्यात येणार असल्याची माहिती नांदेड शाखेचे चेअरमन सी.ए.आनंद काबरा यांनी दिली. सीए साठी अगोदर 12 वी परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. मात्र आता यात बदल करून विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर नवीन नियमानुसार सी.ए.साठी प्रवेश घेता येणार आहे.

या परिक्षेसाठी सीए फाऊंडेशन परिक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. या रजिस्ट्रेशनसाठी कमीत कमी गुणांची अट राहणार नाही. मात्र यासाठी सी.ए. फाऊंडेशन ही परिक्षा 12 वीची परिक्षा पास झाल्यानंतरही देता येते. पण नवीन बदलामुळे सी.ए.होण्याचा कालावधी 6 महिन्यांनी कमी झाला आहे. यासाठी 6 वर्षाचा अभ्यासक्रम राहणार आहे. दहावीनंतर सी.ए.साठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वीच्या अभ्यासक्रमासोबत सीए अभ्यासक्रमाची तयारी करणे आवश्यक होणार आहे.

जे विद्यार्थी सध्या 12 वीत आहेत अशा विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन केल्यास मे 2021 मध्ये होणाऱ्या सीए फाऊंडेशन परिक्षेला ते पात्र ठरतील अशी माहिती नांदेड ब्रॅंच ऑफ इन्स्टिट्यूट डब्ल्यू.आय.आर.सी. ऑफ आय.सी.आय.नांदेड मॅनेजमेंट कमिटी यांनी दिली आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: