
अर्धापूरात आसना पुलावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी लिहिले पालकमंत्र्यांंना पत्र.
जुन्या पुल छोट्या वाहनांसाठी खुला करा- महामार्ग पोलीसांची मागणी
अर्धापूर (शेख जुबेर ) तालुक्यातील आसना पुलावर दररोज सकाळी व सायंकाळी चार ते पाच तास वाहतूक कोंडी होत आहे.ही वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.एकच पुल वाहतूकीसाठी चालु असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.दररोज होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जुन्या पुल मोटार सायकल, कार,जीप,अँटो या छोट्या वाहनांसाठी खुला करावा.यासाठी वसमत फाटा महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान यांनी पालकमंत्र्यांंना पत्र पाठवले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व 161 हा रस्ता आसना नदी पुलावरून जातो.या पुलावरून आठ ते दहा राज्याची वाहने दररोज वाहतूक करतात.परिसरातील हिंगोली, परभणी व तालुक्यातील 60 गावचे नागरिक सकाळ,संध्याकाळ कामानिमित्त नेहमीच प्रवास करतात.नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक,प्रवासी वैतागले आहेत.
पहिले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361,161 हा सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्या अंतर्गत होता.सध्या भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत रस्ता आहे.सन 2018 मध्ये पुणे येथिल धुर्वे कंपनीने सदर पुलाची तपासणी करून छोटे वाहने वाहतूक करता येते असा अभिप्राय दिला होता.
आसना नदीवरील जुन्या पुलाची दुरूस्ती करून छोट्या वाहनांसाठी खुला करावा अशी मागणी वसमत फाटा महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
