Nanded Marathi News

धर्माबाद – मनमाड , काचिगुडा-अकोला, नांदेड- पनवले रेल्वे उद्या पासुन सुरु

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा रेल्वे मंत्र्याकले यशस्वी पाठपुरावा

नांदेड – लॉकढाऊनच्या काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे हळूहळू सुरु होत आहेत. भरातवाडयातील रेल्वे प्रवाशांना चांगला प्रवास करता यावा या साठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे यशस्वी पाठपुरावा केला असुन उद्या पासुन धर्माबाद – मनमाड (हायकोर्ट), काचिगुडा – अकोला आणि नांदेड – पनवेल या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पूर्ववत सुरु होत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक वाहतुकीचे सर्वस्त्रोत बंद केले होते. त्यामुळे कोरणाचा प्रार्दुभाव अनेक पटीन कमी करता आला. जनकल्यानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे असंख्य मानव जिवीताची हनी टाळता आली. या काळात विमान,रेल्वे, ट्रव्हल्स, अंतरराज्य बस सेवा बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असल्याने आता दळणवळणाची सर्व साधने नियम व अटीच्या अधिन ठेवून केंद्र सरकारने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार महाराष्ट्रातील अनेक भागात रेल्वे सेवा पूर्ववत सुरु होत आहेत. नांदेड आणि मराठवाडयातील रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगानी नांदेड जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. या पाठपुराव्यामुळे या पूर्वी काही रेल्वे सुरु झाल्या आता उद्या पासुन धर्माबाद – मनमाड (हायकोर्ट), काचिगुडा – अकोला आणि नांदेड – पनवेल या अत्यंत महत्वाच्या रेल्वे पूर्ववत सुरु होत आहेत. या रेल्वे सेवेचा प्रवाशांनी लाभ घेतांना केंद्र सरकाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे. स्वतः कोरोना मुक्त राहून इतरांना कोरोना मुक्त ठेवण्यासाठी पुढाकार घेवून राष्ट्रसेवेत सहभाग नोंदवावा असे आवाहनही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: