National News

शंकरराव चव्हाण महाविद्यालयात मुक्त विद् यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत शंभर टक्के उपस्थ िती

शंकरराव चव्हाण महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत शंभर टक्के उपस्थिती
अर्धापूर ( शेख जुबेर )
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, अभ्यास केंद्र शंकराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर (८५१२३) येथील बी.ए. तृतीय वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे. बी.कॉम. तृतीय वर्षाच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी १०० टक्के उपस्थिती दर्शवली.
अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रसंयोजक डॉ. साईनाथ शेटोड, सहसंयोजक डॉ.काझी मुख्तारोद्दीन व सदाशिव सिंनगारे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकने परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केल्यापासून विद्यार्थ्यांना संपर्क केला. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर बंद असल्यामुळे प्रत्यक्ष संपर्क होणे कठीण होते परंतु विद्यार्थ्यांची गाव निहाय यादी करून त्या गावातील इतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपर्क केला व व्हाट्सअप ग्रुप करून सर्वांना एकत्र जोडले. परीक्षेसंबंधी विद्यापीठाने व विभागीय कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत विद्यार्थ्यांना याची माहिती दिली. व्हाट्सअप ग्रुपवर विद्यापीठाचे परिपत्रकांची माहिती विश्लेषण करून डॉ.काझी यांनी वेळोवेळी दिली. या कार्यामुळे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या संपर्कात येऊन सर्वांनी परीक्षा दिली.
नांदेड विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार श्री. बी. के.मोहन सर, उपकुलसचिव चंद्रकांत पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी श्री अविनाश कोलते सर व इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बी. कॉम. तृतीय वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असल्याबद्दल विभागीय केंद्राचे संचालक श्री.बी.के. मोहन, उपकुलसचिव चंद्रकांत पवार, प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांनी अभ्यासकेंद्राचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

%d bloggers like this: