Maharshtra News

5 आणि 10 रुपयांची ही नाणी बनवतील श्रीमंत; 10 लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी

नवी दिल्लीः कोरोना संकटातदेखील आपण पैसे कमावण्याचा मार्ग शोधत असाल तर आपल्याला लखपती होण्याची संधी आहे. विशेष म्हणजे आपल्याला त्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे फक्त 5 आणि 10 रुपयांची जुनी नाणी असायला पाहिजेत. आपल्याला या पुरातन नाण्यांचे फोटो वेबसाइटवर अपलोड करावे लागतील. त्यानंतर लोक आपल्या नाण्यांच्या पैशांसाठी बोली लावतील आणि आपण ज्याला पाहिजे त्याला ही नाणी विकून लाखो रुपये कमावू शकता. त्यासाठी 5-10 रुपयांची काही विशेष नाणी आपल्याला जमवावी लागतील. (earn money by selling 5 and 10 rupees)

लखपती कसे बनणार?

मीडिया रिपोर्टनुसार, इंडिया मार्टच्या वेबसाइटवर जुनी नाणी आणि नोटांचा लिलाव केला जात आहे. आपल्याला जुन्या वस्तू गोळा करण्याचा छंद असल्यास, आपला हा छंद आपल्याला लखपती देखील बनवू शकतो. यासाठी तुम्हाला 5  किंवा 10 रुपयांची नाणी हवी आहेत, ज्यावर वैष्णो मातेचा फोटो आहे. आजकाल पैसे कमावण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइटही फायदेशीर ठरत आहेत. आपल्याकडे माता वैष्णोदेवीचे फोटो असलेली 5 आणि 10 रुपयांची नाणी असल्यास आपण ती विकून पैसे कमावू शकता. ही नाणी 2002मध्ये जारी करण्यात आली होती. माताराणीच्या चित्रामुळे लोक या नाण्यांना खूप भाग्यवान समजत आहेत. हिंदू धर्मात माता वैष्णोदेवीची पूजा केली जाते. त्यामुळे अशा नाण्यांसाठी लोक कोट्यवधी रुपये खर्च करून ती विकत घेतात.

आपण किती पैसे कमावू शकता?

या नाण्यांच्या लिलावात विक्री करून आपण 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. याशिवाय या नाण्यांच्या बोलीदरम्यान आपण बोलणीदेखील करू शकता.

आपण ही नाणी कोठे विकू शकता?

इंडिया मार्ट येथे नोटा आणि नाणी घरी बसून चांगल्या किमतीला विकता येऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर देखील, आपल्याला या नाण्यांना चांगली किंमत मिळेल. आपण ही नाणी कंपनीच्या साइटला भेट देऊन विकू शकता. त्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.

ही नोट विकून आपण 25 हजार रुपये कमावू शकता

घरी बसल्या तुम्हाला 25 हजार कमवण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या एक 10 रुपयांची नोट असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर 25 हजार तुमचे. हल्ली बाजारात नव्या नोटा प्रत्येकाला पाहायला मिळतात, पण जुन्या नोटा बाजारातून गायब झाल्या आहेत. अशात जर तुमच्याकडे जुनी 10 रुपयांची नोट असेल तर याची मोठी किंमत तुम्हाला मिळेल. ज्या 10 रुपयांच्या नोटेविषयी आम्ही बोलत आहोत ती भारतात अनेक वर्ष चालली.

Source:https://www.tv9marathi.com/business/earn-money-by-selling-5-and-10-rupees-mata-vaishno-devi-coin-see-how-can-you-sale-it-290813.html

%d bloggers like this: